डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव | लेवाजगत न्यूज :
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बायोकेमिस्ट्री विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रकाश तिरुवा यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर यांच्या वतीने मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. तिरुवा यांनी प्रा. डॉ. सविता राठौर, प्राध्यापक, जैवरसायनशास्त्र विभाग, इंडेक्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (IMCHRC), इंदूर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक "हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमधील थायरॉईड कार्य चाचणी, लिपिड प्रोफाइल, एचएस-सीआरपी पातळी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स यांचा तुलनात्मक अभ्यास" असे होते.
या संशोधनात हायपोथायरॉईडीझमग्रस्त रुग्णांमध्ये थायरॉईड कार्यातील बदल, लिपिड प्रोफाइल, उच्च-संवेदनशील सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (एचएस-सीआरपी) आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स यांच्यातील परस्परसंबंधाचा सखोल अभ्यास करण्यात आला. या निष्कर्षांमुळे हायपोथायरॉईडीझममुळे होणारे जैवरासायनिक आणि दाहजन्य बदल अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होणार असून, भविष्यात निदान व उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रबंधाच्या बाह्य परीक्षक म्हणून डॉ. दीप्ती अग्निहोत्री, प्राध्यापक व विभागप्रमुख, जैवरसायनशास्त्र विभाग, एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर यांनी मूल्यांकनाची जबाबदारी पार पाडली.
डॉ. प्रकाश तिरुवा यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सहकारी, विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील संशोधन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत