Contact Banner

पीएच.डी. पदवीने डॉ. रणधीर कुमार पांडे यांचा शैक्षणिक गौरव; मधुमेह संशोधनाला नवी दिशा

 

पीएच.डी. पदवीने डॉ. रणधीर कुमार पांडे यांचा शैक्षणिक गौरव; मधुमेह संशोधनाला नवी दिशा

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी): डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बायोकेमिस्ट्री विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रणधीर कुमार पांडे यांना निम्स विद्यापीठ, जयपूर (राजस्थान) यांच्यामार्फत मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.


dr-randhir-kumar-pandey-awarded-phd-in-medical-biochemistry-by-nims-university


डॉ. पांडे यांनी डॉ. माधुरी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता, ‘सामान्य रक्तदाब आणि उच्च रक्तदाब असलेल्या टाइप-२ मधुमेह रुग्णांमधील मायक्रोअल्ब्युमिन्युरिया आणि सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) यांचा सहसंबंध’.





या संशोधनात टाइप-२ मधुमेह असलेल्या सामान्य व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मायक्रोअल्ब्युमिन्युरिया आणि सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) यांमधील परस्परसंबंधाचा सखोल अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून मधुमेहामुळे होणाऱ्या मूत्रपिंडाच्या सुरुवातीच्या गुंतागुंती आणि हृदयविकाराचा धोका लवकर ओळखण्यासाठी या जैवरासायनिक निर्देशकांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. परिणामी, रुग्णांचे वेळेवर निदान व अधिक प्रभावी उपचार नियोजन करण्यास या संशोधनाची महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.

डॉ. रणधीर कुमार पांडे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयातील सहकारी, विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.