डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
लेवाजगत न्यूज | जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना मालवांचल विद्यापीठ, इंदूर येथून मेडिकल मायक्रोबायोलॉजी विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. गुड्डेटी यांनी पीएच.डी.चा व्हायवा-व्होसे यशस्वीरीत्या पूर्ण केला. एम.एस्सी. तसेच मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये पीएच.डी. अशी शैक्षणिक पात्रता त्यांनी संपादन केली आहे. त्यांचे संशोधन डॉ. हर्षदा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.
त्यांच्या संशोधनाचा विषय “मध्य भारतातील एका तृतीय-स्तरीय रुग्णालयातील ‘अॅसिनेटोबॅक्टर बॉमॅनी’च्या क्लिनिकल आयसोलेट्समधील कार्बापेनेम प्रतिरोध आणि बायोफिल्म निर्मितीचे फेनोटिपिक व जीनोटिपिक गुणधर्मांकन” असा होता. हे संशोधन संसर्ग नियंत्रण, प्रतिजैविकांचा योग्य वापर तसेच रुग्णांच्या उपचारपद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
या संशोधनाच्या मूल्यांकनासाठी एलएनसीटी मेडिकल कॉलेज, इंदूर येथील मायक्रोबायोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मुकेश बन्सल यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले.
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या व्यवस्थापनासह प्राध्यापकवर्ग व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत