Contact Banner

तांदलवाडीत आ. नंदूभाऊ महाजन यांचा २७ जुलै रोजी भव्य नागरी सत्कार

 

nandubhau-mahajan-grand-civic-felicitation-at-tandalwadi-on-july-27

तांदलवाडीत आ. नंदूभाऊ महाजन यांचा २७ जुलै रोजी भव्य नागरी सत्कार

सावदा | लेवा जगत न्यूज : महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर तांदलवाडीचे सुपुत्र आ. नंदकिशोर (नंदूभाऊ) विमलबाई भागवत महाजन यांच्या सन्मानार्थ तांदलवाडी ग्रामस्थांनी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता तांदलवाडी (ता. रावेर) येथील श्रीहरी सभागृह, श्री दत्त मंदिर संस्थान येथे पार पडणार आहे.






या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन राहणार आहेत. तर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम तसेच आमदार मंगेश चव्हाण, अनिल पाटील आणि अमोल पाटील यांच्या उपस्थितीत आ. नंदूभाऊ महाजन यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याशिवाय खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर अप्पा पाटील, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), सुरेश भोळे (राजूमामा), चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे, माजी आमदार राजाराम महाजन तसेच जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित आहे.

आयोजकांच्या माहितीनुसार, तांदलवाडीसाठी हा सोहळा अभिमानाचा आणि संस्मरणीय ठरणार असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आ. नंदूभाऊ महाजन सत्कार समिती आणि समस्त तांदलवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.