वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची उल्लेखनीय कामगिरी
मुंबईतील प्रतिष्ठित एसीएमसी अभ्यासक्रमात डॉक्टरांचा यशस्वी सहभाग
जळगाव : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या प्राध्यापक विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम (Advanced Course in Medical Education – ACMC) नुकताच मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय येथे पार पडला. या अभ्यासक्रमात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील डॉक्टरांनी यशस्वी सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
वैद्यकीय शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास, मूल्यमापनाच्या आधुनिक पद्धती, अभ्यासक्रम नियोजन, शैक्षणिक नेतृत्व तसेच संशोधन क्षमतांना चालना देणारा हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मेडिकल एज्युकेशन युनिट अधिक सक्षम करण्यासह गुणवत्ताकेंद्रित वैद्यकीय शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एसीएमसी अभ्यासक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. शुभांगी घुले-वाघ, डॉ. निलेश बेंडाळे आणि डॉ. बापूराव बिटे यांनी मुंबई येथील मान्यताप्राप्त नोडल सेंटरअंतर्गत ‘अॅडव्हान्स कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (एसीएमसी) यशस्वीरित्या पूर्ण केला. डॉ. देवेंद्र चौधरी यांनीही हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम सुरू केला असून, त्यांच्या सहभागामुळे संस्थेतील प्रशिक्षित वैद्यकीय शिक्षकांची संख्या आणखी वाढणार आहे.
भविष्यात मेडिकल एज्युकेशन युनिटच्या माध्यमातून विविध प्राध्यापक विकास कार्यक्रम राबवून अध्यापन व मूल्यमापनातील उत्कृष्टतेसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.
एसीएमसी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि रजिस्ट्रार श्री. प्रमोद भिरुड यांनी अभिनंदन केले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव भविष्यातही प्रगतीपथावर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत