Contact Banner

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी; वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा


डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी; वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा

लेवाजगत न्युज जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील फिजिओलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आलोक कुमार यादव यांना दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर), सावंगी (वर्धा) विद्यापीठामार्फत पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. यादव यांनी पीजीआयएमईआर, चंदीगड येथून बीपीएचटी तसेच जेएनएमसी, बेलगावी येथून एम.एस्सी. (मेडिकल) पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवत आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.

त्यांनी प्रा. डॉ. तृप्ती श्रीवास्तव, प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, सावंगी (वर्धा) यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा विषय "दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांमध्ये पारंपरिक उपचारांच्या तुलनेत एरोबिक व्यायामाचा शारीरिक कार्यक्षमता, स्वायत्त मज्जासंस्थेची कार्ये, झोपेचा दर्जा, नैराश्य, चिंता, तणाव आणि इतर शारीरिक मापदंडांवर होणारा परिणाम : एक यादृच्छिक नियंत्रित चाचणी" असा होता.

या संशोधनाद्वारे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णांमध्ये एरोबिक व्यायामाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम अधोरेखित करण्यात आले आहेत. संशोधनामुळे या क्षेत्रातील उपचारपद्धतींना अधिक वैज्ञानिक दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.




डॉ. आलोक कुमार यादव यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे व्यवस्थापन, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.