एकनाथ खडसे ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
एकनाथ खडसे ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
लेवाजगत न्यूज | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मातोश्री येथे खडसे यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.
विशेष म्हणजे, काल भाजपचे नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांची झालेली भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळातील राजकीय समीकरणे आणि घडामोडींविषयी चर्चांना या भेटीने आणखी वेग मिळाला आहे.
मातोश्री येथे ही भेट आपुलकीपूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती मिळाली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत