Contact Banner

फैजपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त संगीतमय श्रीराम कथा; सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

 

faizpur-gurupournima-shriram-katha-khandoba-wadi-devsthan-july-2026

फैजपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त संगीतमय श्रीराम कथा; सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

फैजपूर (प्रतिनिधी): श्री खंडोबा वाडी देवस्थान, फैजपूर (रामपूर), ता. यावल येथे गुरुपौर्णिमा उत्सव आणि ब्रह्मलीन महंत घनःश्यामदासजी महाराज यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त ३० जुलै ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संगीतमय श्रीराम कथा, संतांचे आशीर्वचन, काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.






कार्यक्रमाची सुरुवात ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता कलश यात्रेने होईल. त्यानंतर सायंकाळी श्रीराम कथेचा शुभारंभ होणार असून, ह.भ.प. श्री. भरत महाराज म्हैसवाडीकर दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत श्रीराम कथेचे निरूपण करतील. ५ ऑगस्ट रोजी कथेची सांगता होईल.

६ ऑगस्ट रोजी सकाळी ह.भ.प. श्री. योगी दत्तनाथ महाराज (शिंदखेडा) यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर विविध संत-महंतांचे आशीर्वचन आणि दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर गुरुमंत्र (गुरुदीक्षा) घेण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्यास अयोध्या, काशी, नाशिक, वृंदावन, भुसावळ, रावेर, सावदा, फैजपूर, मुक्ताईनगर आदी ठिकाणांहून अनेक पूज्य संत, महंत, महामंडलेश्वर व कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत.

या धार्मिक सोहळ्याच्या सात दिवसीय पूजेचे मानकरी म्हणून वसंत अमरसिंह परदेशी व सौ. अनुराधा वसंत परदेशी (फैजपूर) यांच्यासह डॉ. लोकेश सुरेश नेहेते (भुसावळ), अशोक हेमा पाटील (आमोदा), अमोल अशोक महाजन (कल्याण), प्रतीक रमेश वारके, नंदकिशोर मधुकर वैद्य, गौरव रमेश राणे (फैजपूर), तेजस मंगल पाटील (हिंगोणे) तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल चौधरी (केयूर टेन्ट हाऊस, फैजपूर), सिताराम बाबा आश्रम मित्र मंडळ (भुसावळ), जय मल्हार गणेश मित्र मंडळ, जय अंबिका लाईटिंग, गणेशोत्सव मित्र मंडळ (फैजपूर-रामपूर) तसेच पंचक्रोशीतील विविध मंडळांचे सहकार्य लाभत आहे.

हा धार्मिक सोहळा परमाध्यक्ष महंत श्री. नृत्यगोपालदासजी महाराज (अयोध्या) यांच्या आशीर्वादाने होत असून, प.पू. श्री १००८ महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तमदासजी महाराज यांचे कृपापात्र राममनोहरदासजी पुजारी, श्री खंडोबा देवस्थान व समस्त फैजपूर परिसरातील भक्तगण यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. व्यवस्थापनाची जबाबदारी महामंडलेश्वर श्री. पवनकुमारदासजी महाराज यांनी स्वीकारली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.