फार्मासिस्ट आणि केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
फार्मासिस्ट आणि केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
मुंबई लेवाजगत न्यूज प्रतिनिधी :- फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक प्रगती, सामाजिक सुरक्षा तसेच संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या फार्मासिस्ट अँड केमिस्ट वेल्फेअर असोसिएशन (PCWA) ने राज्यातील विविध भागांमध्ये संघटनेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मयुरेश नरेंद्र कोल्हे यांनी या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर केल्या.
संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये संस्थापक सदस्य म्हणून स्वप्निल जगदाळे, सचिन शिंदे, विशाल पाटील आणि कु. कल्याणी वाघ यांची निवड करण्यात आली आहे. पद्माकर येवले यांची नवी मुंबई विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, शहराध्यक्ष म्हणून दत्तात्रय शहाजी वाघमारे (पिंपरी-चिंचवड), सौ. अश्विनी अभिजीत गायकवाड (दक्षिण मुंबई), योगेश चौधरी (कल्याण), संतोष पांडुरंग कदम (नाशिक), भूषण राठोड (नागपूर), प्रसाद विकास पाटील (जळगाव) आणि अजय पाचपांडे (वरणगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मयुरेश नरेंद्र कोल्हे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित शहर व विभागांमध्ये PCWA चे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटित प्रयत्नांना बळ मिळेल तसेच संघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यभरातील फार्मासिस्ट व केमिस्ट बांधवांनी PCWA शी जोडून संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
"एकता • सेवा • सक्षमीकरण • प्रगती" हे ब्रीदवाक्य घेऊन PCWA फार्मासिस्ट आणि केमिस्ट यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत