Contact Banner

फैजपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद चौधरी यांची निवड; केतकीताई पाटील यांच्या हस्ते सत्कार

 

faizpur-nagarpalika-upnagaradhyaksh-vinod-chaudhary-satkar-ketkitai-patil

फैजपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विनोद चौधरी यांची निवड; केतकीताई पाटील यांच्या हस्ते सत्कार






लेवाजगत न्यूज फैजपूर : फैजपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेवक विनोददादा अरुण चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाच्या जळगाव पूर्व जिल्हा सरचिटणीस केतकीताई पाटील यांच्या हस्ते विनोद चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नगरसेवक तथा भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, नगरसेविका जयश्रीताई चौधरी, अमिताताई हेमराज चौधरी, सुनिताताई अनंत नेहते, भावनाताई संदीप भारंबे, निकिता प्रकाश कोळी, दिपालीताई जितेंद्र भारंबे, तसेच नगरसेवक सुरजदादा गाजरे, राहुल गुजराती, पवनदादा सराफ, बंटीदादा मंडवाले यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद चौधरी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.