कु. त्रिशा चौधरीचे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
कु. त्रिशा चौधरीचे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
फैजपूर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. त्रिशा श्रीकांत चौधरी हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दि. २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल २५ जुलै २०२६ रोजी जाहीर झाला. या परीक्षेत कु. त्रिशाने १८० गुण मिळवत घवघवीत यश मिळविले.
कु. त्रिशा ही प्रा. डॉ. श्रीकांत उल्हास चौधरी यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि हितचिंतकांनी तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत