Contact Banner

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांना पितृशोक

 

khadi-gramodyog-board-chairman-ravindra-sathe-father-madhav-sathe-passes-away

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांना पितृशोक

मुंबई (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे पदाधिकारी रवींद्र साठे यांचे वडील माधव कृष्ण साठे यांचे रविवारी (दि. २६) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते.






माधव साठे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. त्यांनी भारतीय टपाल विभागात दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर बोरिवली येथील अभिनव नगर परिसरात मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक जनजागृतीचे कार्य केले.

समाजसेवेची जाणीव जपत त्यांनी सुमारे ५० युवकांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच परिसरातील नागरिकांना श्रीमद्भगवद्गीता आणि विविध स्तोत्रांचे नियमित मार्गदर्शन करून संस्कारमूल्ये रुजविण्याचे कार्यही केले.

माधव साठे यांच्या निधनामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी क्षेत्रातील एक कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.