Contact Banner

गायत्रीनगर परिसरात ६० रोपांची लागवड; LNS ८८ बॅचचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम

 


गायत्रीनगर परिसरात ६० रोपांची लागवड; LNS ८८ बॅचचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम

लेवाजगत न्यूज जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने गायत्रीनगर परिसरातील ओपन स्पेस तसेच निमजाय माता मंदिर परिसरात ६० वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात LNS हायस्कूलच्या १९८८ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.






या वृक्षारोपण मोहिमेला आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी वृक्षलागवडीसोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. वाढते तापमान आणि बदलते हवामान लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.

LNS हायस्कूलच्या १९८८ बॅचचे सदस्य तथा फोटोमॅक्सचे संचालक संजय पाटील यांचे सुपुत्र गौरव पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या कल्पनेला बॅचमधील माजी विद्यार्थ्यांसह ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर या उपक्रमाचे नियोजन करून प्रत्यक्ष वृक्षलागवड करण्यात आली.

मोहिमेत वड, पिंपळ यांसह सावली देणाऱ्या विविध देशी वृक्षप्रजातींची रोपे लावण्यात आली. यावेळी नागरिकांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेण्याचा निर्धार केला.

या उपक्रमात LNS हायस्कूल ८८ बॅचचे राहुल कुलकर्णी, अमोघ जोशी, संजय पाटील, रवी गावंडे, आनंद तारे, प्रवीण वाणी, प्रभाकर जाधव तसेच स्थानिक रहिवासी भास्कर सोनार, राहुल पाटील, संजय वाल्हे, तुषार पाटील, धनराज पाटील, पंकज सोनवणे, सचिन वाघ, केतन निसाड, सूरज राठोड आदींनी सहभाग घेत श्रमदान केले.

गायत्रीनगर परिसरातील नागरिकांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत करत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.