Contact Banner

उरणमध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास विरोध; तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन

उरणमध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास विरोध; तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन


उरणमध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास विरोध; तहसिलदार व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन


आरक्षण व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी सर्व संबंधित समाजघटकांशी व्यापक चर्चा करण्याची मागणी

उरण | प्रतिनिधी

उरण तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणास विरोध दर्शवत मंगळवारी (दि. २८ जुलै) तहसिलदार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. हा उपक्रम उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.





निवेदनाद्वारे पदाधिकाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनात्मक आरक्षण व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा बदल करून अनुसूचित जाती समाजामध्ये तेढ किंवा फूट निर्माण होऊ नये, अशी भूमिका मांडली. तसेच अनुसूचित जातींचे घटनात्मक हक्क अबाधित ठेवून सामाजिक न्यायाचे संरक्षण करण्यात यावे आणि आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित समाजघटकांशी व्यापक चर्चा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बीएसपीचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, आरपीआय उरण शहराध्यक्ष दिनेश गायकवाड, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष तथा उपाध्यक्ष खालिद शेख, खजिनदार परशुराम शिवसरण, सचिव सुनील कोल्हे, युवक तालुका अध्यक्ष सुयोग गायकवाड, कामगार नेते नरेश कोळी, बौद्ध पंचायत सरचिटणीस सुनील जोशी, कुणाल म्हात्रे, संकेत पाटील, शैलेश मुळके, जयभीम झलकी, नूर शेख, प्रशांत भागा, देवेंद्र कोळी, मनीष कातकरी, सतीश कसबे, सुनील साबळे, विशाल साबळे, अंबादास रोडे यांच्यासह उरण तालुक्यातील अनेक भीम अनुयायी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.