Contact Banner

मातृभूमी तांदलवाडीत विधान परिषद सदस्य नंदकुमार महाजन यांचा भव्य ग्रामसत्कार

 

grand-civic-felicitation-of-mlc-nandkumar-mahajan-at-tandalwadi

मातृभूमी तांदलवाडीत विधान परिषद सदस्य नंदकुमार महाजन यांचा भव्य ग्रामसत्कार

तांदलवाडी (ता. रावेर) : लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल विधान परिषद सदस्य नंदकुमार महाजन यांचा त्यांच्या मातृभूमी असलेल्या तांदलवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






यावेळी बोलताना नंदकुमार महाजन यांनी, "माझ्या जन्मभूमीतील ग्रामस्थांकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय आहे. हा सत्कार केवळ माझा नसून तांदलवाडीच्या प्रत्येक नागरिकाच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि आशीर्वादाचा गौरव आहे," असे सांगितले. तसेच तांदलवाडीसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या सत्कार सोहळ्यास जलसंपदा मंत्री ना. श्री गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. मा. श्री गुलाबरावजी पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, मंगेशदादा चव्हाण, किशोरआप्पा पाटील, चंद्रकांतभाऊ पाटील, जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, महापौर सौ. दीपमालाताई काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, डॉ. राजेंद्र फडके, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विष्णुभाऊ भंगाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नंदकुमार महाजन यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत त्यांच्यावरील प्रेम व विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.