Contact Banner

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 

nutan-prathamik-vidyamandir-chinawal-class-4-scholarship-exam-success-2026


इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चिनावल | प्रतिनिधी






इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून संपूर्ण चिनावल परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अवनी अट्रावलकर, भावेश पुन्नासे, चिन्मय पाटील, दिप पाटील, देवेंद्र पाटील, ज्ञानश्री नेमाडे, गितेश नेमाडे, गुरु पाटील, हेरंब पाटील, कार्तिक भालेराव, कुंदन नेमाडे, मयंक होले, ओम नेमाडे, पोनन पाटील, प्राची पाटील, पूर्वी भिरुड, राधिका महाजन, रुद्राणी न्हावकर, समर्थ खोडके, सपना पाटील, श्रेयल सोनार, सुनीता पाटील, तनुष लहासे, वेदिका वाघ, यज्ञेश कोल्हे, यशस्वी फेगडे आणि योशिता कोल्हे या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे मोलाचे सहकार्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रभावी तयारी व्हावी यासाठी विद्यार्थ्यांकडून नियमित सराव परीक्षा, विषयनिहाय पुनरावृत्ती, वैयक्तिक शंकानिरसन आणि नियोजनबद्ध मार्गदर्शन करण्यात आले. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे यश असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, चिनावलचे अध्यक्ष सुनील महाजन, चेअरमन खेमचंद्र पाटील, मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर, नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकरे सर, उपमुख्याध्यापिका मीनल नेमाडे तसेच शाळेच्या सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या यशामध्ये इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक संतोष काळेसपना टोके यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच हर्षाली कोल्हेभावना नेमाडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावलच्या शैक्षणिक कार्याला या यशामुळे आणखी बळ मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.