Contact Banner

गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये गुरुजनांचा गौरव

 

guru-pournima-celebrated-at-dr-gunwantrao-sarode-ayurved-medical-college-jalgaon

गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये गुरुजनांचा गौरव

जळगाव | प्रतिनिधी :
गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे मंगळवार (दि. २९ जुलै) रोजी गुरुपौर्णिमेचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आशीर्वाद घेतले.






कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरुचे स्थान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. योग्य मार्गदर्शन, उत्तम संस्कार आणि ज्ञानाच्या बळावरच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील आणि डॉ. वैभव पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.