Contact Banner

जळगावात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी सुरू

 


जळगावात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी सुरू

महादेव हॉस्पिटलमध्ये ११ जुलै रोजी हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

लेवाजगत न्युज जळगाव : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची नियमित मासिक ओपीडी आता जळगाव येथे सुरू होत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आकाशवाणी चौक, विद्यानगर, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान रुग्णांची तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत.

या महिन्यातील विशेष ओपीडी शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. डॉ. महेंद्रसिंह परिहार हे एम.डी., डी.एन.बी. कार्डिओलॉजी असून ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट तसेच जन्मजात हृदयरोग तज्ज्ञ आहेत. हृदयविकाराच्या आधुनिक उपचारांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे.




या ओपीडीमध्ये छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, हार्ट अटॅकची शंका, वारंवार खोकला किंवा थकवा येणे, हृदयाचे ठोके अनियमित किंवा वेगाने पडणे, घबराट होणे, दम लागणे, हात-पायांवर सूज येणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा हृदयविकाराशी संबंधित विविध तक्रारींवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

तसेच बालकांमधील जन्मजात हृदयरोगांचे निदान करण्यासाठीही विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे. वारंवार सर्दी-खोकला किंवा न्यूमोनिया होणे, दूध पिताना घाम येणे, वजन न वाढणे, रडताना किंवा खेळताना दम लागणे, मूल निळे पडणे तसेच सतत चिडचिड करणे, अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. परिहार यांनी केले आहे.

महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अ‍ॅडल्ट व पेडियाट्रिक २डी इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, होल्टर मॉनिटरिंग, कोरोनरी व पेरिफेरल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसविणे, डिव्हाईस क्लोजर, बलून व्हॉल्व्होटॉमी तसेच बायपास व ओपन हार्ट सर्जरीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रुग्णांनी पूर्वनोंदणी करून वेळेवर तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१७०४०५० किंवा ७०२०३७८५१८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.