Contact Banner

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर प्रभावी उपचार

 

mahadev-hospital-jalgaon-laser-treatment-for-kidney-stones-and-prostate

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर प्रभावी उपचार


शासकीय योजनांतर्गत पात्र रुग्णांसाठी मोफत उपचार; लेसर व एंडोस्कोपीमुळे कमी वेदना, जलद बरे होण्याची सुविधा






जळगाव लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक मूत्ररोग उपचार सेवा आता आकाशवाणी चौक येथील महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. लेसर व एंडोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खडे तसेच प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर सुरक्षित, प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

मूत्रमार्गातील खड्यांवर आरआयआरएस (RIRS) या आधुनिक लेसर पद्धतीने, तर वयोमानानुसार होणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर टीयूआरपी (TURP) या एंडोस्कोपिक तंत्राद्वारे उपचार केले जातात. या उपचारांमध्ये शरीरावर मोठा चीरा लागत नाही, रक्तस्त्राव व वेदना कमी होतात, संसर्गाचा धोका कमी राहतो आणि रुग्ण लवकर बरा होऊन दैनंदिन जीवनात परतू शकतो.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांसाठी प्रोस्टेट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी आणि डॉ. शुभम चौधरी हे अनुभवी मूत्ररोगतज्ज्ञ सेवा देत आहेत. मूत्रपिंडातील खडे, लघवी करताना त्रास, लघवी अडणे, वारंवार लघवी होणे, लघवीत रक्त येणे किंवा प्रोस्टेटशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

संपर्क :
महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव
☎️ ०२५७-२२३१००७
📱 ९४२१४ ९३९४३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.