Contact Banner

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणुकीत बंडखोरीची शक्यता?

 

jayant-patil-announcement-shock-shekap-rebellion-chairman-election-22-july-panvel-apmc

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणुकीत बंडखोरीची शक्यता?

पनवेल : कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेलवर सध्या शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. समितीचे सभापती नारायण घरत यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदासाठी येत्या २२ तारखेला निवडणूक होत आहे.






या निवडणुकीत शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते भाई पाटील यांच्या नावाची घोषणा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी अलिबाग येथील बैठकीत यापूर्वीच केली होती. मात्र, आता माजी आमदार बाळाराम पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे देवा मढवी यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे येत्या २२ तारखेला होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीनंतर शेतकरी कामगार पक्षातील अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

उरण : सुनील ठाकूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.