Contact Banner

:जॉग्स सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील; सचिवपदी डॉ. शलाका पाटील, पदग्रहण समारंभ उत्साहात

 

jogs-jalgaon-dr-sandeepkumar-patil-elected-president-dr-shalaka-patil-secretary-2026


जॉग्स सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील; सचिवपदी डॉ. शलाका पाटील, पदग्रहण समारंभ उत्साहात

लेवा जगत | जळगाव प्रतिनिधी

जळगाव ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटी (जॉग्स)च्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ जळगावातील हॉटेल प्रेसिडेंट येथे उत्साहात पार पडला. या वेळी संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील यांची, तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील यांची निवड करण्यात आली.






जागतिक स्तरावर मातामृत्यू कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या जपायगो (Jhpiego) आणि फॉग्सी (FOGSI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी 'अॅडव्हान्सिंग ग्लोबल स्ट्रॅटेजीज फॉर मॅटर्नल डेथ प्रिव्हेन्शन' या विषयावर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी 'जळगाव शून्य पीपीएच मातृमृत्यूकडे वाटचाल' या संकल्पनेवर मार्गदर्शन केले. प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावाच्या (PPH) प्रभावी व्यवस्थापनासाठी आधुनिक शस्त्रक्रिया व उपचारपद्धतींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील यांनीही वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण सेवांचे महत्त्व सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संदीपकुमार पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यकाळात डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी विविध शैक्षणिक, जनजागृती आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी जळगाव आयएमएचे सचिव डॉ. पंकज शहा, जॉग्सच्या माजी अध्यक्षा डॉ. वैशाली चौधरी, माजी सचिव डॉ. अनिता बाविस्कर, तसेच डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुधीर नारखेडे, डॉ. सुमन लोढा, डॉ. सुजाता महाजन, डॉ. रश्मी केळकर, डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह अनेक स्त्रीरोग तज्ज्ञ उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणी (२०२६-२७)

  • अध्यक्ष: डॉ. संदीपकुमार पाटील
  • उपाध्यक्ष: डॉ. आशिषकुमार वाघ
  • सचिव: डॉ. शलाका पाटील
  • कोषाध्यक्ष: डॉ. गजानन पाटील
  • सहसचिव: डॉ. दिप्ती नेहते, डॉ. दिपा रत्नानी, डॉ. कोमल सरोदे
  • वैद्यकीय सचिव: डॉ. प्रशांत पाटील, डॉ. पूनम येवले, डॉ. प्रथमेश जैन
  • सांस्कृतिक सचिव: डॉ. मेधावी चौधरी, डॉ. श्रद्धा राणे, डॉ. चंदन महाजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.