Contact Banner

मतदारांच्या दारी एसआयआर सेवा; सावद्यात BLO शाकीर शेख यांच्या कार्याचे कौतुक

 

savda-polling-booth-17-blo-shakir-sheikh-sir-campaign

मतदारांच्या दारी एसआयआर सेवा; सावद्यात BLO शाकीर शेख यांच्या कार्याचे कौतुक






सावदा प्रतिनिधी-सावदा येथील मतदान केंद्र क्रमांक १७ साठी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाच्या जागी ३० जून २०२६ रोजी शाकीर हुसेन शेख अनवर यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली.


मतदान केंद्र क्रमांक १७ मध्ये एकूण ९३८ मतदार असून, विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत फॉर्म पोहोचविण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर घरोघरी जाऊन मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करत फॉर्म भरून घेतले असून, आजपर्यंत सुमारे ३०० एसआयआर फॉर्म ऑनलाइन अपलोड केले आहेत.


घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेट देत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेक नागरिकांना कार्यालयात जाण्याची गरज भासली नाही. त्यामुळे मतदान केंद्र क्रमांक १७ मधील अनेक मतदारांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.


एसआयआर मोहिमेअंतर्गत उर्वरित मतदारांचे फॉर्म भरणे व अपलोड करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.