धावत्या रेल्वेची धडक; हरिविठ्ठल नगरातील ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
धावत्या रेल्वेची धडक; हरिविठ्ठल नगरातील ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
लेवाजगत न्यूज | जळगाव
जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात धावत्या रेल्वेची धडक लागून एका ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १२ जुलै रोजी घडली. मृत व्यक्तीची ओळख सुभाष सीताराम महाजन (वय ४७, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) अशी झाली आहे.
माहितीनुसार, जळगाव–शिरसोली रेल्वेमार्गावरील खंडेराव नगर परिसरात खांबा क्रमांक ४१६/९ ते ४१६/११ दरम्यान रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती उप-स्टेशन प्रबंधकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर घटनास्थळी आलेल्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीची ओळख सुभाष सीताराम महाजन अशी पटवून दिली. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत