लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांना धनाजी नाना महाविद्यालयात भावपूर्ण अभिवादन
लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांना धनाजी नाना महाविद्यालयात भावपूर्ण अभिवादन
पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सण महोत्सव समितीचा अभिवादन कार्यक्रम; डॉ. एस. के. चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण
फैजपूर | प्रतिनिधी
लोकसेवक स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे राष्ट्रीय सण महोत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. ८ जुलै २०२६) त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला उजाळा देत कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी यांच्या हस्ते स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. एम. टी. फिरके यांची विशेष उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय सण महोत्सव समितीचे प्रमुख डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.
या अभिवादन कार्यक्रमास धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कनिष्ठ, वरिष्ठ व किमान कौशल्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अधिकारी व कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सण महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत श्रद्धापूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत