Contact Banner

अत्याधुनिक आरोग्यसेवा जळगावकरांसाठी वरदान; माजी आ. राजाराम महाजन यांची महादेव हॉस्पिटलला सदिच्छा भेट



अत्याधुनिक आरोग्यसेवा जळगावकरांसाठी वरदान; माजी आ. राजाराम महाजन यांची महादेव हॉस्पिटलला सदिच्छा भेट

लेवाजगत न्यूज | जळगाव : महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाराम (गणू) महाजन यांनी केले.

माजी आमदार महाजन यांनी महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला सदिच्छा भेट दिली. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच रुग्णालयातील इतर मान्यवर उपस्थित होते.






यावेळी डॉक्टरांनी महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक निदान यंत्रणा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया सुविधा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धतीची माहिती माजी आमदार महाजन यांना दिली.

महाजन यांनी रुग्णालयातील स्वच्छता, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डिजिटल आरोग्यसेवा आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांमध्ये न जाता जळगावातच दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महादेव हॉस्पिटलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

महादेव हॉस्पिटलमध्ये विविध सुपरस्पेशालिटी सेवा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा तसेच शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांना दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महानगरांतील सुविधा जळगाव शहरातच आणि विविध शासकीय योजनांअंतर्गत उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही माजी आमदार राजाराम महाजन यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.