विभागीय आयुक्तांचा सातपुडा जंगल सफारी, पाल येथे दौरा; विकासकामांची पाहणी, वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण
विभागीय आयुक्तांचा सातपुडा जंगल सफारी, पाल येथे दौरा; विकासकामांची पाहणी, वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण
पाल (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : नाशिक विभागाचे मा. विभागीय आयुक्त यांनी यावल वनविभागांतर्गत सातपुडा जंगल सफारी, पाल येथे भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि वनसंपदा जतनाशी संबंधित उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
दौऱ्यादरम्यान पाल उद्यानाची पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच जंगल सफारीतील कक्ष क्रमांक २५ व ३० मधील सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधा व सोयींची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
याचवेळी महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, हरित संवर्धन आणि वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी संबंधित वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या पर्यावरणपूरक धोरणांमुळे वनसंवर्धनाबरोबरच पर्यटन विकासालाही चालना मिळत असून सातपुडा जंगल सफारी हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत