Contact Banner

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आमदार अमोलभाऊ जावळे यांचे रक्तदान

 

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आमदार अमोलभाऊ जावळे यांचे रक्तदान


लेवाजगत न्युज रावेर:-


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या वतीने वि.का. सेवा सोसायटी, बक्षीपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





या रक्तदान शिबिरात ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी स्वतः रक्तदान करून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण केल्या. 



याप्रसंगी बोलताना आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले की"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, अभ्यासू वृत्ती आणि जनहिताला प्राधान्य देणारी कार्यशैली राज्याच्या विकासाला नवी दिशा देणारी आहे. त्यांनी विकासकामे आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच, दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनीही आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि स्व. अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येकाने अशा सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे."


कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार नंदुभाऊ महाजन, माजी आमदार अरुणदादा पाटील, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचे सहअध्यक्ष सुरेशभाऊ धनके, राज्य परिषद सदस्या गोमतीताई बारेला, जिल्हा सरचिटणीस केतकीताई पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ शिंदे, कृ.ऊ.बा. सभापती प्रल्हादभाऊ पाटील, जिल्हा चिटणीस विजयभाऊ महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष राजनभाऊ लासूरकर, सुनीलभाऊ पाटील, अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, गटनेते पी. के. महाजन, शिवसेना (शिंदे गट) तालुका संघटक राहुल पाटील, तालुकाध्यक्ष वाय. व्ही. पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष उमाकांत महाजन, सरचिटणीस लखन महाजन, चंद्रकांत वैदकर, पवन चौधरी, निलेश सावळे, बंडू पाटील, अनंत महाजन, स्वप्नील पाटील, समाधान सावळे, विशाल नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी रावेर उत्तर व दक्षिण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजसेवेचा संदेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.