दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईच्या निषेधार्थ रावेर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईच्या निषेधार्थ रावेर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
रावेर (प्रतिनिधी): "ना कोणता पक्ष, ना कोणता झेंडा... फक्त विद्यार्थी आंदोलनाला आमचा पाठिंबा" असा निर्धार व्यक्त करत दिल्ली येथे दि. २० जुलै २०२६ रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या कथित अमानुष व मानहानिकारक कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २७ जुलै) रावेर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना तसेच नागरिकांनी सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी झालेल्या वागणुकीचा निषेध नोंदविला. तसेच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार) किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सेवादलाचे प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, शिवसेना संघटक अशोक शिंदे, आंदोलनाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, प्रदीप सपकाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे, कामगार नेते दिलीप कांबळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ. सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक सफदर पहलवान, विनायक महाजन, रामदास लहासे, ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे सुनील कोंडे, संतोष पाटील, यशवंत धनके, काँग्रेस शहराध्यक्ष धुमा तायडे, शेख सलीम, इस्माईल पहलवान, आर. के. चौधरी, ॲड. जिजाबराव पाटील, प्रतापसिंग राठोड, युवासेना तालुकाध्यक्ष किरण पाटील, शहरप्रमुख निलेश महाजन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत