Contact Banner

पुण्यात नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी व निर्माल्य कलश’ उपक्रमाला हिरवा कंदील; दंडात्मक कारवाईचाही समावेश

 

https://www.lewajagat.com/2026/07/pune-river-canal-cleanliness-proposal-approved/

पुण्यात नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी व निर्माल्य कलश’ उपक्रमाला हिरवा कंदील; दंडात्मक कारवाईचाही समावेश

उरण | प्रतिनिधी-

पुणे शहरातील नदीपात्रे आणि कालव्यांमध्ये वाढत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नदीपात्रांमध्ये कचरा व धार्मिक निर्माल्य टाकण्यास आळा घालण्यासाठी पुलांवर संरक्षक जाळ्या उभारणे, निर्माल्य कलश उपलब्ध करून देणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी देण्यात आली.






प्रभाग क्रमांक २५ च्या नगरसेविका सौ. स्वप्नाली पंडित यांनी मांडलेल्या प्रस्तावात नागरिकांकडून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य व कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नदीवरील पुलांवर उंच जाळ्या बसवून कचरा थेट नदीत जाणे रोखावे, तसेच पुलांच्या दोन्ही बाजूंना निर्माल्य कलश ठेवून नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान समिती सदस्य श्रीकांत जगताप यांनी उपसूचना मांडली, तर सपना छाजेड यांनी त्यास अनुमोदन दिले. उपसूचनेनुसार, ही योजना केवळ एका प्रभागापुरती मर्यादित न ठेवता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व नदीपात्रे आणि कालव्यांमध्ये राबविण्यात यावी. यासोबतच नदी किंवा कालव्यात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली.

या निर्णयामुळे संपूर्ण शहरातील नदीपात्रांचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, तसेच धार्मिक निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी व्यक्त केला.




Pune News, PMC, Pune Municipal Corporation, River Cleaning, River Pollution, Nirmalya Kalash, Pune Rivers, Canal Cleaning, Environmental Protection, Waste Management, Maharashtra News, Civic News, Clean Pune, River Conservation, Pune Development, Municipal Decision, Public Interest, Maharashtra Civic Updates, Pune Environment, Lewa Jagat News

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.