Contact Banner

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावदा बस स्थानकावर वृक्षारोपण

 

uddhav-thackeray-birthday-tree-plantation-savda-bus-stand-raver-2026

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावदा बस स्थानकावर वृक्षारोपण

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर आगाराच्या सावदा बस स्थानक परिसरात शिवसेना (उबाठा)तर्फे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.






रावेर आगाराचे आगार व्यवस्थापक गोविंद पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख भरत नेहते, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, शरद भारंबे तसेच शिवसैनिक किरण गुरव यांनी वृक्षारोपणासाठी आवश्यक वृक्षांची व्यवस्था केली.

कार्यक्रमास रावेर आगाराचे एम. बी. चौधरी, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक एस. के. पाटील, नितीन महाजन, किशोर तायडे, इम्रान शेख, सुनील राणे, संतोष कासार यांच्यासह शिवसैनिक व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.