Contact Banner

सावदा रजा नगरातील आरक्षित ओपन स्पेसला संरक्षक चैनलिंक कंपाऊंडची मागणी

 

सावदा रजा नगरातील आरक्षित ओपन स्पेसला संरक्षक चैनलिंक कंपाऊंडची मागणी


अतिक्रमण रोखून मुलांसाठी सुरक्षित खेळाची जागा उपलब्ध करण्याची रहिवाशांची अपेक्षा


लेवाजगत न्युज सावदा :- 


सावदा शहरातील रजा नगर परिसरातील गट क्रमांक १२५३/२, १३५३, १३४९ व १३७१ मधील आरक्षित ओपन स्पेसला तातडीने संरक्षक चैनलिंक कंपाऊंड उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा, नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील आणि उपनगराध्यक्ष फिरोज खान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


दि. १० जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित ओपन स्पेसला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने भविष्यात अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक जागेचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.


तसेच परिसरातील लहान मुलांना सुरक्षित व मोकळ्या वातावरणात खेळण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी या आरक्षित जागेला चैनलिंक कंपाऊंड उभारणे अत्यावश्यक असल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे.





सार्वजनिक हित लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून संरक्षक चैनलिंक कंपाऊंडचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


या निवेदनावर शेख कुतुबुद्दीन शेख गफ्फार, शेख कलीम शेख जलीस, शेख जमील शेख गुलाब, शेख आकिब शेख इद्रिस, शेख मुखतार शेख अरमान, अजहर खान अजमल खान, युनूस खान दलमीर खान, शेख साबिर शेख रज्जाक, शेख नावेद शेख फिरोज, शेख सलीम शेख अकबर, शेख जावेद शेख कलीम, शेरा इरफान शेख मजीद, मोहम्मद तंजीम शेख कुतुबुद्दीन, मोहम्मद कासीम शेख कुतुबुद्दीन आणि शेख अख्तर शेख रसूल यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.