Contact Banner

मतदार यादी पुनरीक्षणामुळे शाळेची वेळ बदलली; सकाळी ७ ते १२.३० पर्यंत भरणार वर्ग

 

school-timings-changed-due-to-sir-2026-voter-list-revision

मतदार यादी पुनरीक्षणामुळे शाळेची वेळ बदलली; सकाळी ७ ते १२.३० पर्यंत भरणार वर्ग






प्रतिनिधी सावदा -

देशभर सुरू असलेल्या "मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६" या मोहिमेमुळे शाळांमधील काही शिक्षकांची बीएलओ (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज आणि मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार दि. ८ जुलै २०२६ (बुधवार) पासून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित शाळा सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत भरविण्यात येणार आहे.

यासंदर्भात शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालकांना बदललेल्या वेळेची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पाठविण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत हीच वेळ लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.