विनोद तावडे-एकनाथ खडसे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; 'राजकीय चर्चा नाही' – खडसे यांचा खुलासा
विनोद तावडे-एकनाथ खडसे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; 'राजकीय चर्चा नाही' – खडसे यांचा खुलासा
सावदा | लेवा जगत न्यूज-
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथराव खडसे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या भेटीबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनीही प्रतिक्रिया देत भेट झाल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची भेट घेण्यासाठी विनोद तावडे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माझीही भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.
या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून केवळ वैयक्तिक स्वरूपाचा संवाद झाला, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, येत्या २ सप्टेंबर रोजी आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकनाथराव खडसे मोठा राजकीय निर्णय जाहीर करू शकतात, अशा चर्चांना आधीच जोर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची ही भेट राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना कारणीभूत ठरली असून आगामी काळात या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत