Contact Banner

शासकीय दुखवटा जाहीर - कतारचे फादर अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनानिमित्त १३ जुलै रोजी राज्य शोक


state-mourning-declared-on-july-13-after-demise-of-qatar-father-amir-sheikh-hamad-bin-khalifa-al-thani





शासकीय दुखवटा जाहीर 

कतारचे फादर अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनानिमित्त १३ जुलै रोजी राज्य शोक

जळगाव, प्रतिनिधी :-
कतारचे फादर अमीर  :

कतारचे माजी अमीर Sheikh Hamad bin Khalifa Al Thani यांच्या १२ जुलै २०२६ रोजी झालेल्या निधनानिमित्त भारत सरकारने १३ जुलै २०२६ रोजी एक दिवसाचा राज्य शोक (State Mourning) जाहीर केला आहे.

यासंदर्भात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून (Ministry of Home Affairs) १२ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या वायरलेस संदेशाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, न्यायालय, आकाशवाणी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जिल्हा कारागृह तसेच इतर संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी वैषाली चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार राज्य शोक पाळण्यात यावा व संबंधित नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शोकाच्या दिवशी शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविणे तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये आवश्यक त्या शोकसंहितेचे पालन करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.