१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअॅसिडोसिसवर यशस्वी उपचार महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
लेवाजगत न्यूज जळगाव : गंभीर अवस्थेत बेशुद्ध झालेल्या १० वर्षीय चिमुकलीवर महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागाच्या डॉटरांनी वेळेत व योग्य उपचार करून तिचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. डायबेटिक किटोअॅसिडोसिस या जीवघेण्या आजाराचे वेळेत निदान करून दिलेल्या उपचारांमुळे बालिका पूर्णपणे धोयाबाहेर आली आहे.
१० वर्षीय बालिकेला अचानक प्रकृती खालावल्याने ती बेशुद्ध झाली. तिला तातडीने महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल होताच बालरोग तज्ज्ञांनी तिची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान बालिकेला फिट्स (आकडी) येऊ लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. तातडीने आवश्यक रक्त तपासण्या व इतर वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.तपासणी अहवालानुसार बालिकेला डायबेटिक किटोअॅसिडोसिस हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. शरीरातील इन्सुलिनची तीव्र कमतरता झाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीरात आम्लयुक्त ’कीटोन्स’ तयार होतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्ण बेशुद्ध होणे, मेंदूवर परिणाम होणे, अवयव निकामी होणे किंवा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
महादेव रूग्णालयाच्या टीमकडून तातडीने उपचार
रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन महादेव रुग्णालयातील बालरोग विभाग व अतिदक्षता विभागाच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. बालिकेला अतिदक्षता विभागात हलवून सतत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. तिच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार योग्य द्रवोपचार, इन्सुलिन थेरपी, इलेट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक उपचार तसेच इतर पूरक उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तिच्या रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, श्वसन, हृदयाची गती आणि इतर महत्त्वाच्या जैविक घटकांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. डॉटरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वेळेवर सुरू करण्यात आलेल्या उपचारांमुळे बालिकेच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. काही दिवसांच्या उपचारानंतर ती पूर्णपणे शुद्धीवर आली. त्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाल्याने आवश्यक वैद्यकीय सल्ल्यासह तिला सुखरूप घरी सोडण्यात आले.महादेव सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता सुविधा, अनुभवी बालरोग तज्ज्ञ, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि २४ तास उपलब्ध आपत्कालीन सेवा यामुळे अशा गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. या यशस्वी उपचारामुळे पुन्हा एकदा महादेव रुग्णालयाने रुग्णकेंद्रित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा विश्वास कायम राखला आहे.
या टीमकडून उपचार
बालिकेवर डॉ. सिध्दांत घोलप, डॉ. सुनील पाटील, डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनुने, डॉ. नावेद खान, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. विशाल कोठावले यांनी यशस्वी उपचार केले.
डायबेटिक किटोअॅसिडोसिस ही मधुमेहाची अत्यंत गंभीर गुंतागुंत असून विशेषतः मुलांमध्ये ती जीवघेणी ठरू शकते. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन झपाट्याने कमी होणे, उलट्या, पोटदुखी, अशक्तपणा, झोप येणे, श्वासाचा वेगळा वास किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तज्ज्ञ डॉटरांचा सल्ला घ्यावा.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत