Contact Banner

‘द हैदराबाद फाइल्स’ ऐतिहासिक पुस्तकाचे जळगावात विमोचन

 

the-hyderabad-files-book-launch-jalgaon-ulhas-patil-ketaki-patil

‘द हैदराबाद फाइल्स’ ऐतिहासिक पुस्तकाचे जळगावात विमोचन






जळगाव : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ या ऐतिहासिक पुस्तकाचे जळगाव येथे विमोचन करण्यात आले. जळगावचे माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि भाजपाच्या युवा नेत्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

इतिहास अभ्यासक तथा लेखक भारत वाळके यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून, या विषयावर त्यांनी सुमारे १५ वर्षे अभ्यास केला आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर विविध संस्थानांचे विलीनीकरण करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवलेले दमदार नेतृत्व आणि दूरदृष्टी, तसेच हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण कशा पद्धतीने झाले, याचा माहितीपूर्ण आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे.

हैदराबाद संस्थानातील तत्कालीन राजकीय परिस्थिती, मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषिक प्रदेशांचा समावेश, भाषावार प्रांतरचनेनंतर मराठवाड्याचा महाराष्ट्रात झालेला समावेश, तसेच रझाकार संघटनेने हिंदू रयतेवर केलेले अत्याचार, हिंसा, धर्मांतरण आणि निजाम सरकारचे अन्यायकारक कायदे यांसह अनेक ऐतिहासिक घटनांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.

रझाकार आणि निजाम सरकारच्या अन्यायाविरोधात हिंदू रयतेने पुकारलेले बंड तसेच तत्कालीन भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि दूरदृष्टीचा अभ्यासपूर्ण आढावा लेखक भारत वाळके यांनी या पुस्तकातून मांडला आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनीही पुस्तकात महत्त्वपूर्ण संदेश देत इतिहासाविषयी समाजात जागृती निर्माण होण्याची गरज व्यक्त केली आहे.

“आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातून समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रत्येक राष्ट्रभक्ताने हे पुस्तक वाचून आपल्या इतिहासाचा स्वाभिमान बाळगावा,” असे मत युवा नेत्या डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी राकेश वाघ, संकेत शंकपाल, गौरी जोशी, मनीषा खरात, अक्षता शंभरकर, पूजा गांजरे, प्राजक्ता बिडकर, नूतन भाले आदी उपस्थित होते.

पुस्तकासाठी संपर्क : राकेश वाघ – ९९६०३२७३०३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.