रावेर तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी यशवंत महाजन यांची नियुक्ती
रावेर तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी यशवंत महाजन यांची नियुक्ती
रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) अंतर्गत रावेर तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी यशवंत शामराव महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
यशवंत महाजन हे सामाजिक, शैक्षणिक, सहकार व संघटनात्मक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असून त्यांनी विविध पदांवर उल्लेखनीय काम केले आहे. ते उटखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, तंटामुक्ती समिती उटखेडाचे अध्यक्ष, रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक, रावेर तालुका मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष, काँग्रेस शिक्षक सेल (नाशिक विभाग) चे उपाध्यक्ष तसेच माध्यमिक शिक्षक संघ, रावेरचे माजी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत.
याशिवाय त्यांनी माध्यमिक शिक्षक पतपेढी, भुसावळचे माजी तज्ज्ञ संचालक आणि श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था, रावेरचे संचालक म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
महाजन यांच्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा काँग्रेस पक्षाच्या संघटनबांधणीस मोठा लाभ होईल. तसेच रावेर तालुक्यात पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यास त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा विश्वास जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व) चे अध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
यशवंत महाजन यांच्या नियुक्तीबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत