Contact Banner

यावल तालुक्यात धक्कादायक घटना; ७५ वर्षीय वृद्धेवर ४५ वर्षीय व्यक्तीकडून कथित लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

 

yawal-75-year-old-woman-allegedly-sexually-assaulted-accused-arrested

यावल तालुक्यात धक्कादायक घटना; ७५ वर्षीय वृद्धेवर ४५ वर्षीय व्यक्तीकडून कथित लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत






प्रतिनिधी | यावल

यावल तालुक्यातील एका गावात ७५ वर्षीय वृद्धेवर ४५ वर्षीय व्यक्तीने कथित लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोमवारी दुपारी घरात एकटीच भुईमुगाच्या शेंगा फोडत बसली होती. त्यावेळी रवी चव्हाण (वय ४५) हा पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. महिला पाणी आणण्यासाठी घरात गेल्यानंतर आरोपी तिच्या पाठोपाठ घरात शिरल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने महिलेवर बळजबरी करून घराच्या मागील स्वयंपाकघरात कथित लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पीडित महिला घाबरल्यामुळे आणि सामाजिक बदनामीच्या भीतीने शांत राहिली. मात्र, नंतर तिने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मंगळवारी फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.