Contact Banner

लोकनेते आ.एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोथळीत अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

 

Eknathrao-Khadse-Amrut-Mahotsav-Akhanda-Harinam-Saptah-Kothali-2026

लोकनेते आ.एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोथळीत अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

लेवाजगत न्यूज कोथळी : माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खडसे परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिर परिसरात दि. २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तिमय सोहळ्याचा आज मंगलमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्यासह संत, कथाकार, कथा वाचक, प्रवचनकार, प्रमुख अतिथी, खडसे परिवारातील सदस्य, स्नेहीजन तसेच कोथळी व मुक्ताईनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे श्रीक्षेत्र कोथळी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. सप्ताहाच्या कालावधीत हरिनाम संकीर्तन, प्रवचन, संत चरित्र वाचन तसेच श्रीमद् भागवत कथा यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.