स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचा ‘रोगमुक्त भारत, नशामुक्त भारत’ जनजागृती उपक्रम
स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचा ‘रोगमुक्त भारत, नशामुक्त भारत’ जनजागृती उपक्रम
लेवाजगत न्यूज सावदा : डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव येथील स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांनी ‘रोगमुक्त भारत, नशामुक्त भारत’ या संकल्पनेवर आधारित जनजागृती उपक्रम उत्साहात राबविला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध आजारांपासून बचाव, आरोग्यविषयक काळजी तसेच व्यसनांचे शरीर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षिका ज्योती रावते यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आरोग्य व व्यसनमुक्तीचे महत्त्व समजावून सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सावदा शहरात जनजागृती रॅली, जनसंवाद आणि जाहिरात फलकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य व व्यसनमुक्तीबाबत जागृती केली. विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे ‘निरोगी जीवन जगा, व्यसनांपासून दूर राहा’ असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
या उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. स्काऊट शिक्षक प्रशांत सोनवणे, गाईड शिक्षिका कल्पना वाणी यांच्यासह इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी समाजहिताचा संदेश देत राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. निरोगी आणि नशामुक्त भारत घडविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत