Contact Banner

नेपाळमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन


Nepal-Flood-Jalgaon-Citizens-Help


नेपाळमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

लेवाजगत न्यूज जळगांव -

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक व नागरिक तेथे अडकले आहेत.

या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना तातडीने आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय, मुंबई यांच्यातर्फे ऑनलाइन माहिती नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

जळगाव जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी किंवा नातेवाईकांनी खालील लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.






🔗 माहिती नोंदविण्यासाठी:

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
📞 0257-2223180 / 2217193
📱 9373789064

अडकलेल्या नागरिकांची माहिती तातडीने नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.