Contact Banner

सुमित राजेंद्र बऱ्हाटे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

 

sumeet-rajendra-barhate-appointed-district-vice-president-of-all-india-lewa-patidar-yuva-mahasangh

सुमित राजेंद्र बऱ्हाटे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती





लेवाजगत न्यूज भुसावळ : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भुसावळ येथील सुमित राजेंद्र बऱ्हाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाशराव व्ही. पाटील आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पी. भोळे (बंडू) यांनी नियुक्तीपत्राद्वारे बऱ्हाटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.

नियुक्तीपत्रात सुमित बऱ्हाटे यांनी समाजोपयोगी आणि राजकारणविरहित सेवा करून समाजाच्या उन्नतीस हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवा वर्ग आणि इतर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासोबतच संघटनेचा विस्तार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करणे, अधिकाधिक समाजबांधवांना संघटनेशी जोडणे आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची जबाबदारीही बऱ्हाटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सुमित राजेंद्र बऱ्हाटे यांच्या नियुक्तीबद्दल लेवा पाटीदार समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा मिळून युवा वर्गाचे संघटन अधिक प्रभावी होईल, तसेच समाजहिताच्या उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.