अंबरनाथ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
अंबरनाथ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
लेवाजगत न्युज अंबरनाथ : युवा समिती, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, अंबरनाथ शहर यांच्या वतीने आयुर्या हॉस्पिटल, कांसई सेक्शन, अंबरनाथ (पूर्व) येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात ९५ हून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तर ३२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी रक्तदाब व मधुमेह तपासणी तसेच डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला अशा विविध सुविधांचा नागरिकांनी लाभ घेतला. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सोपान इंगळे, लेवा समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. गुणवंत भंगाळे, माजी अध्यक्ष श्री. एकनाथ चौधरी, कार्यवाह श्री. राजेंद्र झोपे तसेच समाज मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय लेवा स्पोर्ट्स क्लबतर्फे श्री. लोकेश चौधरी व त्यांची टीम, इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्सची टीम तसेच भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभागाच्या सचिव सौ. भाग्यश्रीताई पाचपांडे यांचीही उपस्थिती लाभली.
युवा समिती प्रमुख श्री. मयुरेश कोल्हे, जिल्हा समिती सदस्य श्री. अक्षय राणे व श्री. दीपक नेमाडे, अंबरनाथ शहर अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील आणि सचिव सौ. स्मिता चौधरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शुभम काळे, श्री. किरण नेमाडे, श्री. भूषण चौधरी, सौ. रुपाली कोल्हे, सौ. वीणा काळे, सौ. हर्षाली कोल्हे, श्री. पियुष ढाके, सौ. वर्षा वराडे तसेच सर्व समिती सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमासाठी Ayurya Hospital (डॉ. स्वप्ना चौधरी व डॉ. राहुल चौधरी), 32 Whites Dental Clinic (डॉ. कुणाल चौधरी), महालक्ष्मी डेंटल क्लिनिक (डॉ. मेधावती चौधरी), Fortis Hospital Team आणि Bhavar Blood Bank, Badlapur यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच लेवा पाटील समाज मंडळ, अंबरनाथ, लेवा स्पोर्ट्स क्लब, अंबरनाथ आणि इनरव्हील क्लब अंबरनाथ हिल्स यांचेही सहकार्य मिळाले.
आरोग्य तपासणीच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती आणि रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणारे मान्यवर, डॉक्टर, रक्तदाते, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत