आमोदा येथे गंगुबाई कडू पाटील यांचे निधन
आमोदा येथे गंगुबाई कडू पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज आमोदा : येथील रहिवासी गंगुबाई कडू पाटील (वय ९५) यांचे सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, आप्तेष्ट व परिचितांनी शोक व्यक्त केला.
ही बातमी बघण्यासाठी Q code स्कॅन करा -महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार एकनाथरावजी खडसे (नाथभाऊ) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री संत मुक्ताई चरित्र कथा, भागवत कथा सप्ताह तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
गंगुबाई पाटील या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबाला संस्कार व आधार देत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या उत्तम पाटील, रमेश पाटील व एकनाथ पाटील यांच्या मातोश्री होत.
गंगुबाई पाटील यांच्या निधनाने आमोदा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आप्तेष्ट व नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत