यशवंत बोरनारे यांचे निधन
यशवंत बोरनारे यांचे निधन
लेवाजगत न्यूज उल्हासनगर : निंभोरा, ता. रावेर येथील मूळ रहिवासी तथा सध्या उल्हासनगर येथे वास्तव्यास असलेले यशवंत दोधुजी बोरनारे (वय ६१) यांचे शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या निधनाने बोरनारे परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, तीन वहिनी, दोन बहिणी, मेव्हणे, भाचे, भाची व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
यशवंत बोरनारे हे रविंद्र दोधुजी बोरनारे, शरद दोधुजी बोरनारे सर व अनिल दोधुजी बोरनारे सर यांचे मोठे बंधू तसेच मनोहर बन्सी आमोदकर यांचे शालक होत. त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व बोरनारे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत