आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी जागा मंजूर
यावल लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, मौजे यावल, ता. यावल, जि. जळगाव येथील गट क्रमांक १२३३ मधील जागा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये सदर जागा संबंधित आदिवासी विभागास वसतिगृहाच्या प्रयोजनासाठी वितरित करण्यात आली आहे.
या मंजुरीमुळे यावल तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना सुरक्षित, दर्जेदार आणि सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
*आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांचा पुढाकार*
यावल, रावेर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहाची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून, वसतिगृहासाठी शासकीय जागा मंजूर झाली आहे.
यासोबतच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय सुविधा व कार्यालये यावल येथे उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही प्रयत्न करण्याचा आमदार अमोल जावळे यांचा मानस आहे.
सदर जागेचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करणे, निर्धारित
आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश; यावलमध्ये आदिवासी वसतिगृहासाठी शासकीय जागा मंजूर
यावल | प्रतिनिधी : यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मौजे यावल, ता. यावल, जि. जळगाव येथील गट क्रमांक १२३३ मधील जागा आदिवासी वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशान्वये सदर जागा संबंधित आदिवासी विभागास वसतिगृहाच्या प्रयोजनासाठी वितरित करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सुरक्षित, दर्जेदार आणि सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग खुला झाला आहे. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा लाभ होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृहाची गरज लक्षात घेऊन आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून आता वसतिगृहासाठी शासकीय जागा मंजूर झाली आहे.
यासोबतच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय सुविधा व कार्यालये यावल येथे उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही प्रयत्नशील राहण्याचा मानस आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केला आहे.
मंजूर जागेचा वापर केवळ निर्धारित प्रयोजनासाठी करणे, ठरवून दिलेल्या कालावधीत बांधकाम पूर्ण करणे तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणांच्या मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशातील सर्व अटी व शर्तींचे पालन करणे संबंधित विभागासाठी आवश्यक राहणार आहे.
मोजणी, सीमांकनानंतर प्रत्यक्ष बांधकामाला मिळणार गती
मंजूर जागेचा ताबा देणे, मोजणी व सीमांकन करणे तसेच महसूल अभिलेखात आवश्यक नोंदी करण्याची पुढील कार्यवाही संबंधित विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर वसतिगृहाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निर्णयाचे यावल तालुक्यात स्वागत होत असून, आदिवासी समाजाच्या वतीने आमदार अमोलभाऊ जावळे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत