Contact Banner

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

 

national-sports-day-dr-ulhas-patil-college-of-physiotherapy-jalgaon-sports-competitions



national-sports-day-dr-ulhas-patil-college-of-physiotherapy-jalgaon-sports-competitions

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

लेवाजगत न्यूज जळगाव, २९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (DUPCOP), जळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रिकेट आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत क्रीडा दिनाला उत्साहाचे स्वरूप दिले.

क्रिकेट स्पर्धेत विद्यार्थ्यांचे तीन संघ सहभागी झाले. यामध्ये DUPCOP Lions, DUPCOP Titans आणि DUPCOP Rangers या संघांचा समावेश होता. अटीतटीच्या आणि रंगतदार सामन्यांमध्ये DUPCOP Rangers संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर DUPCOP Titans संघाने उपविजेतेपद मिळविले.






बॅडमिंटन स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंतिम सामन्यात ट्विंकल माळी आणि भारती शेजूळ यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद आपल्या नावे केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शैक्षणिक अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सांघिक सहभाग वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी दिसून आले.

या क्रीडा उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल गिरी, डॉ. अमित जयस्वाल, डॉ. अनुराग मेहता, डॉ. आशिषकुमार पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धांमध्ये सहभाग घेत क्रीडा दिनाचा आनंद लुटला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.