अशोक हिरामण नारखेडे यांचे निधन
अशोक हिरामण नारखेडे यांचे निधन
आमोदा : येथील रहिवासी व हल्ली डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक अशोक हिरामण नारखेडे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.
अशोक नारखेडे यांनी उल्हासनगर येथील शांती ग्राम विद्या मंदिरात माध्यमिक विभागात शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या निधनाने विद्यार्थी, सहकारी शिक्षक, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ८ वाजता डोंबिवली पूर्व येथील जिमखाना, डोंबिवली बस डेपोच्या बाजूला असलेल्या त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ते स्वप्निल नारखेडे यांचे वडील होत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत