Contact Banner

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीचे आवाहन

 

birthday-appeal-by-dhananjay-shirish-chaudhari-avoid-wishes-expenses-and-help-the-needy

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीचे आवाहन






लेवाजगत न्यूज सावदा : जळगाव जिल्हा ग्रामीण पूर्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे धनंजय शिरीष चौधरी यांचा वाढदिवस २० ऑगस्ट रोजी आहे. यंदाचा वाढदिवस कोणताही मोठा उत्सव न करता शांतपणे ईश्वराचे आशीर्वाद घेत आणि आजवरच्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत साजरा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी आपण घराबाहेर असल्यामुळे मित्र, कार्यकर्ते व हितचिंतकांना प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याबद्दल चौधरी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच नेहमीप्रमाणे आपले प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा मोलाच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त फुले, पुष्पगुच्छ, बॅनर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याऐवजी शक्य असल्यास ती रक्कम एखाद्या गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी अथवा सामाजिक उपक्रमासाठी वापरावी, अशी नम्र विनंती त्यांनी केली.

“माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला, तर तीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल,” अशी भावना धनंजय चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.