Contact Banner

भाजपातर्फे सावदा पोलीस ठाण्यात निवेदन; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध

bjp-savda-submits-memorandum-demanding-action-over-alleged-offensive-remarks-against-union-minister-raksha-khadse


भाजपातर्फे सावदा पोलीस ठाण्यात निवेदन; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध






लेवाजगत न्यूज सावदा, दि. ३ ऑगस्ट : भारतीय जनता पार्टी, सावदा शहरच्या वतीने सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार येथील विजय चौधरी यांनी कथित ऑडिओ क्लिपमध्ये रक्षाताई खडसे यांच्याविषयी अश्लील, अवमानकारक व मानहानीकारक भाषा वापरल्याचा आरोप आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे एका महिला लोकप्रतिनिधीचा तसेच समाजातील महिलांच्या सन्मानाचा अवमान करणारे असल्याने संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्षाताई खडसे या जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधी असून त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कथित वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.




यावेळी नगरध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील, सारिका भरत चव्हाण, गटनेता तथा नगरसेविका रंजना जितेंद्र भारंबे, नगरसेवक पंकज राजाराम येवले, नगरसेवक सचिन चूडामण बऱ्हाटे, नगरसेवक नकुल निलेश बेंडाळे,नगरसेविका जयश्री अतुल मेहते, गजानन बाबूराव भारंबे,माजी नगरध्यक्षा देवयानी नितीन बेंडाळे, शैलेश चंद्रकांत चौधरी, नगरसेविका सुनीता संजय तायडे, जितेंद्र किशन भारंबे, सागर दुर्गादास चौधरी, महेश मुरलीधर बोंडे, राहुल मधुकर चौधरी, तेजेंद्र अरुण चौधरी, लतेश रमेश सरोदे, सागर नंदकुमार पाटील, शरद मनोहर कस्तुरे, मुरलीधर रविंद्र चौधरी, लतेश रविंद्र चौधरी, सोमा दिलीप पाटील, प्रदीप दिलीधर पाटील, गिरीश संजय बेंडाळे, गौरव बाबुराव सेतवाल, महेश प्रभाकर अकोले, दीपक रमेश श्रावगे, सुरज मोहन चौधरी, निलेश दिनकर फेगडे, स्वप्नील सुनील पाटील, प्रथम विपिन ढाके, संतोष परदेशी, नगरसेवक विशाल भागवत सोनवणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.